गोंदिया येथे पूरी अहमदाबाद एक्सप्रेस मधून ९ किलो गांजा जप्त


Gondia : गोंदिया जंक्शन येथे रेल्वे पोलिसांनी पूरी अहमदाबाद एक्सप्रेस मधून ९ किलो गांजा जप्त केला आहे. गोंदिया रेल्वे पोलीस दल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी अहमदाबाद पुरी एक्सप्रेसची तपासणी केली असता डबा क्रमांक एस -6 मध्ये त्यांना एक ट्रॉलीबॅग संशयास्पद दिसून आली त्याची तपासणी केली असता तेथे ९ किलो गांजा आढळला. विशेष म्हणजे यापूर्वी देखील पुरी एक्सप्रेस मधून ७ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

Print Friendly, PDF & Email
Share