देवरी तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार

देवरी २०: तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याधापक संघ देवरीच्या वतीने नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक वसंत खराबे यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे, मुख्याध्यापिका रजिया बेग मंचावर स्थानपन्न होते.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक त्यांचा सपत्नीक ह्दयसत्कार समारंभ मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाल श्रीफळ ,भेट वस्तू व सन्मान चिन्ह ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.

व्यासपिठावर संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे यांनी प्रास्ताविकेतून संघाची परंपरा विषयी प्रकाश टाकला. यांच्या सेवेतील आठवणी जाग्या केल्या. सत्कारमूर्ती वसंत खराबे यांनी शिक्षक सेवेत असताना अनेक विद्यार्थीघडवून आदर्श विद्यार्थी कसा घडवला पाहिजे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम विद्यालयाचे मुख्याद्यापक जीतेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याद्यापक हुकरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशासाठी संघाचे पुर्व अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद गिरहेपुंजे, मनोज भुरे, महेंद्र मेश्राम, जी. एम. मेश्राम, श्री. शहारे, डॉ. सुजित टेटे तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share