डॉ. बारसागडे “प्रेसिडेन्ट अप्रीशीयशन” अवार्ड ने सन्मानित

◆नागपूर येथे सिध्देश्वर सभागृहात चार्टर नाईट व अवार्ड सिरेमनी सोहळ्याचे आयोजन

देवरी,ता.१९: देवरी तालुक्यातील बोरगावं/बाजार येथील शासकिय माध्यमीक व उच्चमाध्यमीक आश्रमशाळा तथा एकलव्य रेसिडेन्शियल माँडेल स्कुल चे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर जागतीक सामाजीक संस्था रोटरी क्लब पश्चिम नागपूर चे सदस्यपद ग्रहण केले.आणि वर्ष २०२२-२३ मध्ये “से नो टू प्लास्टीक” चे प्रोजेक्ट चेअरमेन झाले. यांनी गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त गावात “से नो टू प्लास्टीक” हा प्रकल्प यशस्वीपणे राबवून या विषयी अधिक चा प्रचार व प्रसार केला.
डॉ. बारसागडे यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लबने वर्ष २०२२-२३ च्या चार्टर नाईट व अवार्ड सिरेमनी या भरगच्च सोहळ्यात रोटरीयन डॉ. जगदीश बारसागडे यांचा प्रोजेक्ट च्या यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याबद्दल रोटरीच्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा ” प्रेसिडेन्ट अप्रीशीयशन अवार्ड” ने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा रविवार रोजी नागपूर येथील सिध्देश्वर सभागृहात पार पडला.
यात सविस्तर असे की, डॉ. जगदीश बारसागडे यांनी रोटरीचे वर्ष २०२२-२३ मध्ये प्रात:पाल गजानन रानडे,सचिव(प्रशासन) ऋषीकेष गुप्ते,सचिव (प्रोजेक्ट) पंकज गडकरी यांचेसह काम्युनिटी सर्व्हिस चे डायरेक्टर राजेश भिडे आणि “से नो टू प्लास्टीक” या प्रोजेक्ट अंतर्गत अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग,नागपूर मध्ये येणा-या आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील आश्रमशाळा,अनुदानित आश्रमशाळा,एकलव्य रेसिडेन्शियल माँडेल स्कुल,वस्तीग्रुह,प्रकल्प कार्यालय ,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया व गडचिरोली आणि इतर आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालय,पब्लिकस्कुल व इतर शाळांमध्ये “से नो टू प्लास्टीक” हा प्रकल्प यशस्वीपणे राबवून या विषयी अधिक प्रचार व प्रसार केला
रोटरी इंटरनैशनल चे अध्यक्ष गार्डन मेक्नली यांनी नागपूर येथे”से नो टू प्लास्टीक” या प्रोजेक्टची दखल घेत “क्रयेट होप इन द वर्ड” या विषयाची माहिती देतांना म्हटले की, रोटरी क्लब मध्ये नेहमीच देश आणि जगाच्या भल्यासाठी काम केले आहे. या मध्ये पर्यावरण व पर्यावरणाचा -हास ही भेडसावणारी जागतिक ज्वलंत समस्या व यामुळे मानवी जीवनावर होणा-या परिणामास आळा घालण्यासाठी “से नो टू प्लास्टीक” ह्या प्रोजेक्ट अंतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमाचे व त्यांना या उपक्रमांतर्गत कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले. गार्डन मेक्नली यांनी ह्या प्रोजेक्टचे तोंडभरून कौतूक केले.
अशाप्रकारे रोटरी क्लब च्या नागपूर येथील सिध्देश्वर सभागृहात आयोजीत चार्टर नाईट व अवार्ड सिरेमनी सोहळ्यात रोटरीयन डॉ. जगदीश बारसागडे यांचा “से नो टू प्लास्टीक” या प्रोजेक्टसाठी दिलेले भरीव कार्य व त्यामधील योगदानास्तव यांचा रोटरीच्या प्रतिष्ठेचा “प्रेसिडेन्ट अँप्रीशीयशन अवार्ड” ने सन्मान करण्यात आला.

Share