चिचगड पोलीस आणि सी-60 पथकाने दिले हरीणाला जीवनदान
देवरी ◼️ गोंदिया जिल्हाचा पारा चांगलाच वाढला असतांना त्याचा विपरीत परिणाम वन्यजीवावर देखील झालेला दिसत आहे. नुकतेच देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चिचगड व स.दु.पिपरखारी यांच्या प्रयत्नाने दादालोरा खिडकी योजने अंतर्गत सी-60 तुरकर पथक यांना अभियान दरम्यान एक अस्वस्थ हरिण मिळुन आले. तापमानातील वाढ आणि पाण्याच्या शोधात जंगली हरीण शेवटच्या घटीला मोजतांना दिसताच त्यास वनविभागाला स्वाधीन करून जिवदान दिले. यामध्ये स.पो.नि.जानकर यांनी पो.शि.राठोड/2154 पो.स्टे.चिचगड यांचे सहकार्याने वनविभागासी संपर्क करुन वनरक्षक चांदा, शेटीवार, लांडगे, झामरे व परिहार यांना सदर हरिण ताब्यात दिले. त्यांनी पशुवैद्यकिय अधिकारी देवरी यांचेकडे औषधौपचार करुन हरिनीचे जिव वाचविण्याचे कार्य केले.