देवरी◼️ जिल्हात अपघाताचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. देवरी आमगाव महामार्गाचे सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण होताच जंगलव्याप्त रस्त्यावर डांबरीकरण महिनाभरा पूर्वी करण्यात आले. परंतु बोरगाव येथे डांबरीकरण रस्त्यावर महिना भरात मोठे खड्डे पडले असून याठिकाणी अपघात घडला आहे. यामध्ये देवानंद जेमखेड़े रा. वडेगांव जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू आहे. सदर महामार्गाचे काम पाटील कंस्ट्रक्शन कंपनी द्वारे करण्यात आले परंतु सीमेंट रस्त्याला जागो जागी तडा आणि भेगा पडल्यामुळे कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येत नाही. महिनाभरापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा पडल्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. त्यामुळे पाटील कंस्टिक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामीण लोकांनी केली आहे.








