बाप-लेकांनी केली युवकाची निर्घृण हत्या

◼️तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील घटना

Tiroda : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील एका 28 वर्षिय युवकाची शेतात जनावरे चरन्यास गेल्याच्या जुन्या वादावरून तीन बाप लेकाने मिळून युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. मृतक गुरुदास माणिकचंद रहांगडाले याचे गावातीलच चंद्रकुमार तुमळे यांचे शेतात मागील वर्षी जनावरे चरण्यास गेल्याने झालेले नुकसानी वरून वाद सुरू होता. ज्यावरून काल रात्री सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता तीन बाप लेकांनी मिळून या युवकास पकडून त्याचे वर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. गुरुदास याला नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचारा करिता नेले होते. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून गोंदिया येथे पुढील उपचाराकरता पाठवले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी 2 बापलेकास ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share