गोंदिया जिल्हातील१५३ बालके झालीत कुपोषणमुक्त

◼️पोषण पुनर्वसन केंद्राची मेहनत ; चार ठिकाणी चालते कुपोषण मुक्तीचे काम

गोंदिया ◼️जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्तदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या तसेच लहान बालकांच्या आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिला गर्भावस्थेत असताना तिला संतुलित आहार मिळत नसल्याने पोटातील गर्भ कुपोषित होते.जन्माला येणारी बालके कुपोषित म्हणू जन्माला येत असल्याने त्या बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाला मोठे प्रयत्न करावे लागतात. येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राने (एनआरसी) सन २०२२-२३ या वर्षात १५३ बालके कुपोषमुक्त केली आहेतधकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे व लहान मुलांकडे दुर्लक्ष होते; परंतु कोरोनाच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण घटले आहेशहरी भागातील बालके गोलमटोल झाली आहेत तर ग्रामीण भागातील कुपोषणसुद्धा कमी झाले आहे. त्याला एकच कारण आई- वडिलांनी कोरोनाच्या काळात आपल्या मुलांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे त्यांच्या वजनात वाढ झाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील अतितीव्र स्वरूपाच्या १५८ बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी सन २०१२- २३ या वर्षात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १५३ बालके सामान्य श्रेणीत आली आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share