डायल ११२ मुळे,गोंदिया जिल्ह्यात २०१७ महिलांचे संरक्षण

गोंदिया : इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम अंतर्गत तत्काळ पोलीस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल ११२ योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत आतापर्यंत 8 हजार 242 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 6 हजार 739 तक्रारीचा निपटारा करण्यात जिल्ह्यातील कार्यरत डायल 112 यंत्रणेला यश आले आहे.या डायल ११२ ने गोंदिया जिल्ह्यातील २०१७ महिलांचे संरक्षण केले आहे.लोकांना तत्काळ मदत मिळावी याउद्देशाने जिल्हा नियोजन व विकास निधीतून ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून पोलीस ठाण्यांसाठी ४० बोलेरो आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी ६ स्कॉर्पिओ खरेदी करण्यात आल्या होत्या. ही वाहने थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडलेली असतात,जिथे जीपीएस वाहनांची जागा कळते.
सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण आल्यास ११२ हा फक्त एक नंबर डायल केल्यावर ई-मेल व मोबाईल अप्लिकेशनद्वारे नियंत्रण कक्षात संदेश येताच तत्काळ क्यू. आर. टी. (क्विक रिस्पॉन्स टीम ) पोलीस मदतीला धावतात.२४ तास ही आपत्कालीन सेवा उपलब्ध करुन दिली गेली आहे.

२८ सप्टेंबर २०२१ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ८२४२ कॉल्स आले आहेत.यात २०१७ कॉल महिलांवरील गुन्ह्याशी संबंधित आहेत.५० कॉल मुलांच्या संबंधित आहेत.मृतदेह आढळल्याचे ३१ कॉल,बेपत्ता झाल्याच्या ६९ तक्रारी तर ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित २८६ तक्रारीं आल्या. इतकेच नव्हे तर रस्ता अपघातात जखमींना वेळीच रुग्णालयात नेल्याने ४३५ जणांना वाचविण्यात यश आले आहे.गुरांच्या तस्करीच्या ३९ तक्रारी प्राप्त झाल्या.

डायल ११२ अंतर्गत २४ तास आपत्कालीन सेवा प्रदान केली जाते.यासाठी जिल्हास्तरावर एक समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक स्तरावरील अधिकारी आणि जवान, एक पोलीस अधिका री आणि आपत्कालीन वाहनांमध्ये पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे कार्यरत डायल 112 यंत्रणा स पो नि.इमरान मुल्ला यांचे देखरेखी खाली टेकनिशियन (इंजिनिअर)सचिन फाये, शुभम नागपुरे, पोलीस अंमलदार सुदिपा उराडे,प्रीती मेश्राम, सोनू गौरी, हर्षा लिल्हारे, मोमलता पटले, रवीना शहारे हे ही यंत्रणा सक्षमपणे राबविण्याचे कार्य करीत आहेत.

डायल ११२ योजना गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तुम्ही कधी अडचणीत सापडलात तर ११२ वर डायल करा, तुम्हाला लगेच पोलिसांची मदत मिळेल. पण या ठिकाणी फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो.डायल ११२ वर ११० वेळा खोटे कॉल करून खोटी माहिती दिल्यावरून पोलिसांनी महालगाव येथील आरोपी महिलेच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा पोलीस प्रशासन द्वारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी जिल्ह्यातील जनतेला जागृत होऊन एखादी घटना घडत असताना डायल 112 चा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share