अवकाळी पावसाने देवरी तालुक्याला ‘धुतले’

देवरी ◼️ महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाने अद्याप जिल्हाला सोडले नाही. त्यात गुरूवार रात्री पासून रविवार च्या सकाळ पर्यंत बरसलेला पाऊस या महिन्यातील सर्वाधिक पाऊस दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या अवकाळी पावसाने देवरी तालुक्याला धुऊन काढले आहे. देवरी तालुक्याला सर्वाधिक ४४.३ मिमीपावसाची नोंद घेण्यात आली आहे.

सातत्याने तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पारा घसरत गेला. एप्रिल महिन्यात सुरूवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने एंट्री मारली आहे. बघता-बघता महिना संपत आला असून, या महिन्यातील काही दिवस वगळल्यास ढगाळ वातावरण व अवकाळी पावसातच हा महिना निघून गेला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस देवरी तालुक्यात बरसल्याचे दिसत आहे. देवरी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४४.३ मिमी पाऊस बरसला असून त्यानंतर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सरासरी ३९.९ मिमी पाऊस बरसला आहे. तर सर्वांत कमी सरासरी १४.८ मिमी पाऊस गोरेगाव तालुक्यात बरसला आहे.

Share