नगरपंचायत देवरी तर्फे महाराष्ट्र दिनानिनित्त माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती
◼️अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सह मुख्याधिकाऱ्यांची हजेरी
देवरी ◼️नगरपंचायत देवरी येथे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसानिमित्तनगर पंचायत कार्यालय येथेनगराध्यक्षसंजु उईके, नगर पंचायत देवरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर शहरात रॅली काढुन माझी वसुंधरा अभियान बाबत जनजागृती करण्यात आली व शहरात ठिकठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करुन, माझी वसुंधरा बाबतची प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये के. एस. जैन विद्यालय येथील प्राचार्य रजिया बेग व इतर शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे समारोप नगर पंचायत सभागृहात प्रधानमंत्री स्वनिधी लाभार्थ्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी नगर पंचायतचे पदाधिकारी अध्यक्ष संजु उईके, उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, सभापती कमल मेश्राम व नगरसेवक आफताब शेख, कौशल्याबाई कुंभरे, सुनीता शाहू, तणुजा भेलावे, संजय दरवडे, सिता रंगारी, मोहन डोंगरे, नितिन मेश्राम, श्रीमती पिंकी कटकवार, पंकज शहारे, शकीलखान कुरैशी व मुख्याधिकारी प्रणय तांबे तथा समस्त पदाधिकारी व कर्मचारी नगरपंचायत देवरी यांच्या उपस्थितीत पार पडले.