गोंदिया-गडचिरोली सी 60 पथकाला सर्वोत्कृष्ठ संचलनाचा मान

गोंदिया◼️ प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित संचालनात सहभागी 21 पथकांमध्ये गोंदिया-गडचिरोली सी 60 पथक सर्वोत्कृष्ट ठरले. या पथकाला पुरस्कार देऊन 29 एप्रिल रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल, गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात गोंदिया-गडचिरोली सी-60 पथकाने सहभाग घेतला होता. या संचलनामध्ये गोंदिया- गडचिरोली सी-60 पथकाने सहभागी 21 पथकांमधून सर्वोत्कृष्ट संचलन केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने गोंदिया-गडचिरोली सी-60 पथकाला प्रथम क्रमांकाने सन्मानित केले आहे. 29 एप्रिल रोजी मुंबई येथे आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमामध्ये अप्पर पोलिस महासंचालक अनुप कुमार यांच्या हस्ते गोंदिया-गडचिरोली सी 60 पथकाचे नेतृत्व करणारे पथकप्रमुख पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या पथकात गोंदियाचे पोलिस उपनिरिक्षक खेडकर, ढाकणे तर गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील, बोडरे यांचा समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email
Share