अंगणवाडी केंद्र सकाळ पाळीत करा: सविता पुराम

गोंदिया ◼️वाढते तापमान पाहता व उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सकाळी 7.30 ते 10 वाजतादरम्यान सुरु करण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनानुसार, जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून सातत्याने तापमान वाढत आहे. यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली असून अवकाळी पावसानंतरही जवळपास 40 अंशाजवळ तापमान आहे. वाढता तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना होण्याची शक्यता राहते. जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रात विद्युत व्यवस्था नाही, जिथे आहे त्यातील अनेक केंद्रात पंखेही नाहीत. त्यामुळे बालकांसह केंद्रातील कर्मचार्‍यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सकाळी 7.30 ते 10 वाजता दरम्यान सुरु करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स

Print Friendly, PDF & Email
Share