ब्रेकिंग: सामूहिक वनहक्क समितीच्या पट्ट्यावरील उभ्या झाडाची कत्तल करुन चोरी, वनविभागाची उदासीन भूमिका?

देवरी ◼️ तालुक्यातील उत्तर देवरी वनपरिक्षेत्राअंतर्गत ग्राम पंचायत ओवारा येथील सामूहीक वनहक्क व्यवस्थापन समिती आमसभा ओवारा यांना सामूहीक हक्काचा पट्टा मिळालेल्या गटांचे (मालमता) उभे झाडे कापून चोरी झाली असल्याची तक्रार वनविभागाला देण्यात आली परंतु वनविभागाने सदर तक्रारीवर कुठलीच कारवाई केलेली नसून वनविभागाची संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप सामूहिक वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अनुसूचीत जमाती व इतर पारंपरीक वननिवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारीत नियम २०१२ अन्वये, ग्राम सभा ओवारा या गावाला सामूहीक हक्काचा पट्टा प्राप्त झाला आहे. सदर गटातून गट क्र ६३, २८४, २८५, २९१ या गटातील उभे- झाडे कापून चोरी झाली आहे. तसेचे इतर गटातून सुद्धा चोरी झाली असल्याची माहिती वनहक्क व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. तहसीलदार देवरी तसेच वनपरिक्षेत्राधीकारी यांना केली आहे. सदर घटनेची तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी लिखित तक्रार करुन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. गावकऱ्यांनी लाकूड भरलेलेट्रक सायं ८ च्या सुमारास रोकून धरला काही वेळाने लाकडाचा ट्रक पोबारा केल्याचे वृत्त आहे.

सदर घटनेवर वनविभाग काय कारवाई करते याकडे गावकरी आणि सामूहिक वनहक्क समितीचे लक्ष आहे.

सदर घटनेची मला माहिती नाही काय प्रकरण आहे माहिती घेतो अशी माहिती वनपरिक्षेत्राधीकारी उत्तर देवरी यांनी प्रहार टाईम्सला दिली.

Share