पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत ठाणेदार प्रविण डांगे यांच्याहस्ते लाभार्थ्याला राशन कार्ड वितरण

◼️गोदिया जिल्हा दलातर्फे व पोलीस स्टेशन देवरी सौजन्याने राशन कार्ड वितरण

देवरी ◼️कम्युनिटी पोलीससिंगच्या माध्यमाने दादा लोरा खिडकी योजनेर्तेत पोलीस ठाणे देवरी मार्फत मा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन.मा.अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर. उपविभागीय पोलीस अधिकारी सा.देवरी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दादालोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी याकरिता गोदिया जिल्हा पोलीस दल यांचे सौजन्याने दिनांक १७/०४/२०२३ रोजी नामे उदाराम बकाराम मेश्राम रा. टोयागोंदी व भोजराज मोतीराम मेश्राम रा.चिचेवाडा यांचे राशन कार्डसाठी कागदपत्र गोळा करुन तहसिल कार्यालय देवरी जावुन पाठपुरावा करुन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे याचे मार्गदर्शनात पोशि दिनेश धर्मे यांनी तहसिल कार्यालय देवरी येथे संबधीत विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क करुन राशन कार्ड प्राप्त करुन दिले अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी ठाणेदार प्रवीण डांगे , सपोनि आंददराव घाडगे यांच्या सह दिनेश धर्मे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share