सावधान 🚨 चोरांचा पोलिसांच्या घरीच डल्ला, देवरी येथे चोऱ्यांची शृंखला कायम

◼️देवरी येथे पोलिसांचे घरच असुरक्षित तर सामान्य जनतेचं काय? सवाल जनतेचा

देवरी ◼️ नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देवरी येथे जणू चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. मोटरसायकल, सोनेचांदीचे दुकान आणि घरफोड्यांचे प्रमाणात वाढ झालेली आहे. नुकतेच महावीर राईसमिल येथील चोरीचे प्रकरण ताजे असतांना देवरी येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरीच चोरांनी हातसाफ केला आहे.

विशेष म्हणजे देवरी पोलिसांकडून बाहेर जातांना घरातील दागिने मौल्यवान वस्तू बँक लॉकर मधे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु बँक लॉकर सर्वसामान्याना परवडणारा नसून बँक देखील असुरक्षित असल्याचे चित्र जिल्हात दिसून आले असून पोलिसांची भूमिका काय ? मागील ३ महिन्यापासून देवरी असुरक्षित झाली का ?असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.

नवीन प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ३०/०३/२०२३ चे २३:४५ वा. ते दिनांक ३१/०३ /२०२३ चे पहाटे ०६:०० वा. दरम्यान यातील फिर्यादी उषाकिरण शालिकराम दखने, वय ३६ वर्ष, रा. देवरी वार्ड क्र. १६ गोंडवाना नगर, ही रूमला लॉक लावुन डयुटीकामी उपमुख्यालय देवरी येथे गेली व ती डयुटी चा पहारा संपुन पहाटे ०४:१५ वा. आपले रूमवर आली असता मेन गेटवरली लॉक खोलुन आतमध्ये व्हरांडयात जावुन पाहिले असता रूमचे समोरील दाराची कुंडी तुटलेली दिसली व कुलुप रूमचे समोर मोटर सायकलचे सिटवर ठेवलेले दिसले नंतर फिर्यादी नी रूमचे आत मधल्या खोलीत जावुन पाहिले असता तिला आलमारी खुली दिसली व आलमारीतील कपडे व सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले व आलमारीचे लॉकर खुले दिसुन आले. आलमारीत लाल डब्बीत ठेवलेले ०३ ग्रॅम सोन्याचा डोरला अंदाजे किंमत ९,००० /- रू चा व २ ग्रॅम सोन्याचे मनी अंदाजे किंमत ६,०००/- रु. चा माल आलमारीत दिसुन आले नाही. असा एकुण १५,००० /- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करुन चोरुन नेले. तसेच फिर्यादी हिला मोहल्यात सकाळी माहित झाले की, मोहल्यातील नामे सौ. वसुंधा मस्के रा. वार्ड क्र. १६ देवरी यांचे भाडेकरूचे रुम मध्ये चोरी झालेली आहे असे माहित झाल्याने फिर्यादी नी नामे वसुंधा मस्के यांचे घरी जावुन पाहणी केली असता तिला त्यांचे घरी राहत आलेल्या रुमचा अज्ञात चोरटयानी दाराची कुंडी तोडुन घरात आत प्रवेश करून आलमारी तोडुन आलमारीतील लॉकर मध्ये जर्मन डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीणे व नगदी १५,००० /- रु. असा एकुण ३४०००/–रु. माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन पोस्टे देवरी येथे अप क. ८६/२०२३ कलम ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा / २३२ मस्के पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Share