देवरी येथे ४९ हजाराची घरफोडी

देवरी ◼️ घरफोडी प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ३० / ०३ / २०२३ चे २३:४५ वा. ते दि. ०१/०४/२०२३ चे ११:०० वा. दरम्यान यातील अज्ञात चोरानी सुना मोका पाहुन फिर्यादी सौ. टिकेश्वरी धमेंद्र शाहु, वय २४ वर्षे, रा. वार्ड क्र. १६ गोंडवाना नगर देवरी, ता. देवरी, व घरमालक सपना बालसिंग मुलेटी, वय ४१ वर्ष, यांच्या घराच्या समोरील दरवाजाचे ताल्याजवळील कुंडी तोडुन घरात प्रवेश करून दोन्ही घरातुन ४९,१०० /- रू. चा माल चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे देवरी येथे अप क. ८७/२०२३ कलम ४५७,३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा / ११३६ हिवराज परसमोडे पोस्टे देवरी, हे करीत आहेत.

Share