श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे ३१ व्या सामूहिक विवाहात ५७ जोडपी विवाहबद्ध
गोंदिया ◼️जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय आणि धार्मिक केंद्र असलेल्या माँ मांडोदेवी देवस्थानमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ज्योती कलशाची स्थापना केली जाते. नवरात्रीचे ९ दिवस विविध राज्यांतून येथे भाविकांची गर्दी असते. यासोबतच दिवसा नऊ दिवस हवन कार्य करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. आणि रात्री जेवणाची व्यवस्था केली जाते. गेल्या ३० वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षीही आमगाव तालुक्यातील तेढा गावचे नाजिक येथील जागृत देवस्थान श्री सुर्यादेव मांडोबाई देवस्थानात चैत्र नवरात्रीनिमित्त १०३१ कलश प्रज्वलित करण्यात आल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. दरवर्षी रामनवमीच्या मुहूर्तावर सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते.सामुहिक विवाहाचे हे ३१ वे वर्ष होते ज्यात ५७ जोडपी विवाहबद्ध झाली. नवविवाहित जोडप्याला पंखा कुलर, जोडी, डोर्ला मणी, पाच प्रकारची भांडी तसेच माँ मांडोदेवीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही नवविवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवन जावो यासाठी आशीर्वाद दिले.त्याचबरोबर नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर कन्हैयालालजी महाराज, गौतम महाराज, त्रिपाठी महाराज, अयोध्यादास महाराज, महाराजांनी त्यांची विधिवत पूजा केली.
या दरम्यान माजी खासदार डॉ.खुशालजी बोपचे, माजी मंत्री राजकुमारजी बडोले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान संस्था चे अध्यक्ष विनोदजी अग्रवाल, माजी आमदार संजयजी पुराम, भाउरावजी उके अध्यक्ष जेकेपी, मुनेश रहांगडाले सभापती गोंदिया, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मोहनजी गौतम, ग्रामीण मंडल अध्यक्ष छत्रपालजी तुरकर, सभापती सविता संजय पुराम, गोरेगांव पस सभापती मनोजजी बोपचे, हनवंतजी वट्टी, शैलेशजी नंदेश्वर जिप सदस्य अनंदाताई वाढीवा, जिप सदस्य कुरहाडी, दीपाताई चंद्रिकापुरे, शैलजाताई कमलेश सोनवाने पस सदस्य, कमलेशजी सोनवाने, डॉ.जितेन्द्र मेंढे, नंदकिशोर गौतम, श्री.जगनितजी,योगराजजी धुर्वे, शिवाजी सर्राटे, पो.पाटील, श्यामभाऊ ब्राम्हणकर, किशोरजी शेंडे, अमोलजी भारती, श्री.कापसेजी, हुकुमचंदजी अग्रवाल, चेतनजी बजाज, हौसलालजी रहांगडाले, आमगांव पस सभापती, दिनदयाल चौरागढ़े, रविजी बघेले,श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान के सचिव डॉ.लक्ष्मणजी भगत, भैयालालजी सिंदराम उपाध्यक्ष, कुशनजी घासले सहसचिव, विश्वनाथजी असाटी, कोषाध्यक्ष, शालिकरामजी उइके,सकाराम सिंदराम, राहुलजी अग्रवाल, दिलीपजी खंडेलवाल, इत्यादी पदाधिकारी व गणमान्य या दरम्यान उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन दीलिप खंडेलवाल यांनी व आभार डॉ लक्ष्मण भगत यांनी मानले.