🚨ब्रेकिंग: सुनंदा ज्वेलर्स येथील चोरीप्रकरणी ३ आरोपी देवरी पोलिसांच्या जाळ्यात

◼️देवरी येथील ज्वेलर्स दुकानातुन सोन्याचे दागीने चोरी करुन नेणारे तीन आरोपी देवरी पोलीसांनी पकडुन ताब्यात घेतले

देवरी◼️ येथील सुनंदा ज्वेलर्स दुकाणात अनोळखी ३ पुरुष व त्यांचे सोबत २ महिला जाऊन दुकाण मालकास आम्हास सोन्याची चैन, झुमके खरेदी करायचे आहे असे म्हणुन त्यापैकी पुरुषांणे दुकाणदार यांना बोलण्यात गुंतवुन नजर चलाखीने दुकाण मालकाची दिशाभुल करुन सोन्याची चैन किंमती ४५,०००/ रु. चोरी केली आणि आपले जवळील असलेले दागीने अर्धातासात मोड करुन आणतो अशी बतावणी करुन पळुन गेले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी, विजय भिसे उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार प्रविण डांगे पोलीस निरीक्षक यांनी अनोळखी इसमांच्या शोधासाठी सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे , पोलीस नाईकरामराव कांदे, पोलीस शिपाई कमलकिशोर चव्हाण, पोलीस शिपाई रोशन डोहळे यांचे पथक रवाना केले आणि दिनांक २९/०३/२०२३ रोजी सोन्याची चैन चोरुन नेणारे तीन आरोपीतास पकडुन देवरी येथे आणले आहे.

आरोपी १) संदिप राम जाधव वय ३५ वर्षे रा. रा. पुणे २) सचिन किसन सातकर वय ३५ वर्षे रा. येरवडा / पुणे३) अश्विन विजय सोळंकी, वय ४२ वर्षे रा. येरवडा / पुणे येरवडा पुणे येथे मिळुन आले.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मप्रविण डांगे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. हिवराज परसमोडे पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share