देवरी पोलिसांनी जपली माणुसकी, रस्त्यावर पडलेल्या अज्ञात इसमाला दिले जीवनदान

देवरी ◼️ ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. याचीच प्रचिती आज देवरी येथे बघावयास मिळाली. देवरी आमगाव रोड वर अग्रसन भवन समोर मुख्यमार्गावर एक अज्ञात इसम बेवारसपणे पडलेला होता. मुख्यरस्ता असल्यामुळे शेकडो लोकांनी याठिकाणाहून येजा केले परंतु मतिमंद किंवा वेडा व्यक्ती असल्याचा अंदाज बांधत त्या इसमाच्या मदतीला कुणी धावले नसल्याचे वृत्त आहे.

सदर माहिती देवरी पोलिसांना कळताच दुपारी १२ च्या सुमारास त्या मृत्यूशी लढणाऱ्या इसमाला ११२ चे वाहनचालक नंदेश्वर आणि एक पोलीस कर्मचारी यांनी देवरी येथील रुग्णालयात दाखल करुन माणुसकी जपली. कायदे व सुव्यवस्था कामासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देवरी पोलिसांना प्रहार टाईम्स डिजिटल मीडियाचा कडक सॅलूट.

Print Friendly, PDF & Email
Share