सेवानिवृत्त प्राचार्य आणि सेवानिवृत्त परिचर यांचा सत्कार करून भदंत राहुल बुद्ध विहाराने साजरा केला वर्धापन दिन

Deori◼️ भदंत राहुल बौद्ध विहार सांस्कृतिक समिती परसटोला येथे वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.त्यानिमित्त विशेष सत्कारमूर्ती म्हणून आयु. के.सी .शहारे( सेवानिवृत्त प्राचार्य, मनोहर भाई पटेल हायस्कूल व जुनिअर कॉलेज देवरी),आयु.मिलिंद व्ही.दामले (सेवानिवृत्त मुख्याध्यापक , जिल्हा परिषद प्राथ.शाळा,नकटी), आयु.सुरेश एन.भीवगडे (सेवानिवृत्त परिचर,मनोहर भाई पटेल हायस्कूल जुनियर कॉलेज, देवरी) लाभले होते.या सत्कार सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आयु. जी.एम.मेश्राम सर,आयु. पंकज शहारे ,आयु. यादोरावजी पंचवार ,आयु. छन्नुजी कोटांगले आयु.ग्यानिराम शहारे, आयु.सुरेशजी मेश्राम मंचावर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव आयु.नितेश लाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात विहाराच्या पार्श्वभूमी विषयी माहिती दिली. या सत्कार सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या विहाराच्या व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कारमूर्तींना समितीच्या वतीने पुष्पगुच्छ ,शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी गावातील सर्व बौद्ध समाज बांधवांनी व समितीतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश लाडे व आभार अमित भिवगडे यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share