ब्रेकिंग: अट्टल चोर पोलिसांच्या हातात, चोर आंतरराज्यीय टोळीचा सदस्य

◼️घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी सदस्यास अटक, घरफोडीचे अनेक गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची उल्लेखनिय कामगिरी

देवरी ◼️दि. २६/०३/२३ रोजी ०५.०० वा चे सुमारास मौजा देवरी येथील १) महावीर राईस मिलच्या दाराचे कुलूप तोडून ३ अनोळखी चोरटयांनी घरफोडी करून मिल मधील रोख रक्कम ४,३८,०००/-असा मुद्दे माल चोरून नेल्यावरून तक्रारदार श्री. श्रेय नंद कुमार जैन वय ३५ वर्षे, रा.वार्ड क्र १, देवरी, ता. देवरी, जि. गोंदीया यांचे तक्रारी वरून पो.स्टे. देवरी येथे अप.क्र ८१/२३ कलम ४५७,३८० भादवि अन्वये तसेच त्याच दिवशी मौजा नवाटोला येथील रहिवाशी श्री.कृष्णा चंद्रया पंचमवार वय ६० वर्षे, रा. नवाटोला, देवरी,ता.देवरी,जि.गोंदीया यांचे राहते घराचे दरवाज्या चे कुलूप तोडून त्याच ३ अनोळखी चोरटयांनी घरफोडी करून एक तोळे सोन्याची चैन व नगदी असा एकुण ६२,०००/- रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यावरून तक्रारीवरून पो.स्टे. देवरी येथे अप.क्र ८०/२३ कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचबरोबर कोहमारा येथील सहकारी सोसायटी चे शटर तोडून चोरीचा प्रयत्न् केला होता. त्यावरून पो. स्टे. डुग्गीपार येथे अप क्र.९८/२०२३ अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे

गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढते चोरी व घरफोडीचे प्रमाण पाहता तसेच देवरी येथे एकाच दिवशी तिन मोठ्या घरफोड्या झाल्याने मा. पोलीस अधिक्षक, श्री . निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक,गोंदिया श्री. अशोक बनकर, यांनी वरील प्रमाणे नमूद दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून सदरील दोन्हीं गुन्हयातील अज्ञात चोर ट्यांचा शोध घेऊन तात्काळ गुन्हे उघडकीस आणणे बाबत पो. नि.स्था. गु. शा. गोंदीया श्री.दिनेश लबडे यांना आदेश दिले . मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश व आदेशान्वये पो. नि. श्री. दिनेश लबडे यांनी याबाबत स्था.गु. शा.येथील अधिकारी, व पो.अंमलदार यांना गुन्हयातील आरोपी तांचा शोध घेवून तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्या च्या सूचना केल्या व आरोपीतांचे शोधाकरीता दोन वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे दोन्हीं पोलीस पथक हे देवरी येथील दाखल गुन्ह्या चा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ ते डोंगरगढ पर्यंत प्राप्त सी.सी. टी. व्ही. जवळ पास ६० ते ७० ठिकाणचे फुटेज अभ्यासून तसेच गोपनीय माहीतीच्या आधारे,व तांत्रिक विश्लेषण वरून यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असता, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी नामे- प्रदिप ऊर्फ दादु देवधर ठाकुर हा डोगरगड, (छ.ग) परिसरा मध्ये असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पथकाने दि.२८/०३/२३ रोजी ०१.३० वा गुन्हयात वापर लेल्या “पांढरे रंगाचे इंडिका व्हिस्टा” मोटर कार सह मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले . त्यास गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्याने वरील नमूद दोन्हीं गुन्हे त्याचे साथीदार १) नरेश महिलांगे व २) रणजीत यांचेसह संगणमत करून केले असल्याची कबुली दिली. आरोपी नामे) प्रदिप ऊर्फ दादु देवधर ठाकुर वय ३० वर्षे याचे ताब्यातून ४७,०००/ रूपये रोख रक्कम तसेच चोरी करतां ना गुन्ह्यांत वापरलेली पांढरे रंगाची इंडिका वीस्टा मोटर कार क्र.सी.जी.०५ यु ४३७३ किंमती अंदाजे ३,००,०००/ रुपये असा एकूण किंमती ,४७,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी यास उर्वरीत त्याचे साथीदार )नरेश महिलांगे ) रणजीत यांचेबाबत विचारणा केली असता त्यांची माहिती नसल्याचे सांगितले. पो.ठाणे देवरी १) अप क्र. ८०/२०२३ कलम- ४५७,३८० भादवि २)अप क्र.८१/२०२३ कलम- ४५७,३८० भादवि ३) पो. स्टे. डुग्गीपार अप. क्र.९८/२०२३ कलम ४५७,३८०,५११ चा गुन्हा नमूद तिन्ही इसमांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीप्रदिप ऊर्फ दादु देवधर ठाकुर वय ३० वर्षे, रा. देवघर मोहल्ला, खपराभाट, बलोद,राज्यछत्तीसगड यास मुददेमाला सह पुढील कायदेशीर कारवाई होणेस पोलीस ठाणे देवरी, जिल्हा गोंदिया येथील पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास पो . ठाणे देवरी पोलीस करीत आहेत आंतरराज्यीय घरफोडीचे आरोपी नामे) प्रदिप ऊर्फ दादु देवधर ठाकुर वय ३० वर्षे साथीदार नामे ) नरेश महीलांगे ) रणजीत यांचेविरूद्ध नागपूर जिल्ह्यातील, भंडारा जिल्ह्यातील, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तसेच् नागपूर शहर मद्ये सुद्धा अनेक गुन्हे मद्ये हे आरोपी पोलिसांना हवे आहेत…. नागपूर आणी भांडरा पोलीस सुद्धा या आरोपीतांचा शोध घेत होती…..गोंदिया मधील सुद्धा इतर गुन्हे या आरोपी कडून उघड होण्याची शक्यता आहे…. मा. वरिष्ठांचे आदेशान्वये व पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरील नमूद दोन्हीं गुन्ह्याचा छडा लावून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सपोनी श्री विजय शिंदे, पोउपनि जीवन पाटील, पो.अंमल दार पो.हवा. तुलसीदास लुटे, राजू मिश्रा, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, चेतन पटले,प्रभाकर पलांदुरकर, दीक्षित दमाहे, संजय मारवाडे , विनोद बरय्या, मोहन शेंडे, धनंजय शेंडे, हंसराज भांडारकर, अजय रहांगडाले, मुरली पांडे, विनोद गौतम, मपोशी कुमुद येरने यांनी अथक परिश्रम घेवून दोन्हीं गुन्ह्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. वरिष्ठांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पो . अंमलदारांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share