शेतकर्‍यांनी नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारावे: जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

गोंदिया ◼️येथील शेतकरी प्रामुख्याने धानाची शेती करीत असला तरी स्ट्रॉबेरी, ड्रगन फ्रुट सारखे नवनविन उत्पादन घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सेंद्रीय गुळाची निर्मीती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रयोगशील शेती करावी. येथील शेतकर्‍यांसाठी जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकर्‍यांच्या उत्पादनाला नेहमीच प्रशासनाचे सहकार्य राहील, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारावे जेणेकरुन प्रशासकीय मदत करण्यास सोईचे होईल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोदी मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, पंचायत समिती सभापती मुनेश्वर रहांगडाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी राजु इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे डॉ. सैय्यद अली, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, तंत्र अधिकारी कावेरी साळे उपस्थित होते. पंकज रहांगडाले यांनी महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना तसेच शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे कृषी महोत्सवाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. Farmers शेतकर्‍यांनी जे विकेल ते पिकेल अशा पिकाचे उत्पादन घ्यावे. महिला आता आत्मनिर्भर झालेल्या आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना विक्री करण्यासाठी पंचायत समितीमध्ये 2 दुकाने उपलब्ध करुन देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक प्रगतीशील शेतकर्‍यांनी कृषी क्षेत्रात व सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक क्षेत्रात जिल्ह्याची ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे तांदूळ आहे. भविष्यात अनेक फलोत्पादन घेऊन जिल्ह्यात प्रगती घडून येईल असा आशावाद मुनेश्वर रहांगडाले यांनी व्यक्त केला.  

यावर्षी 2 हजार 500 महिला बचतगटांना 80 कोटी रुपये कर्ज देण्यात आले. 310 महिलांना 3 कोटी रुपये वैयक्तिक कर्ज दिले. संयुक्त दायित्व गट यामधून 8 कोटी रुपये कर्ज देण्यात आल्याचे संगेकर यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कृषी, धान्य महोत्सव, उत्पादक ते थेट ग्राहक थेट विक्री, चर्चासत्र व परिसंवाद, पौष्टिक तृणधान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा, खाद्य महोत्सव, खरेदीदार विक्रेता संमेलन, सेंद्रीय शेतमाल विक्री, शेतकरी सन्मान समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमक, विविध शासकीय योजनांवर मार्गदर्शन व Farmers चर्चासत्र आयोजन करण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रसंगी जयश्री पुंडकर, छाया मेश्राम, डॉ. मंगला कटरे, सविता तुरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळाचे 70 स्टॉल, कृषी विभाग व संलग्न 30 स्टॉल, कृषी यांत्रिकीकरण 20 व इतर 30 स्टॉल, असे एकूण 150 स्टॉल्स लावलेले आहेत. कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share