पोलीस स्टेशन देवरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
देवरी ◼️मा. पोलीस अधिक्षक सा. गोंदिया यांचे संकल्पनेतुन दिनांक ८ मार्च रोजी मा. श्री. अशोक बनकर सा. अप्पर पोलीस अधिक्षक कॅम्प देवरी जिल्हा गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली मा. संकेत देवळेकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात व श्री. प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी, सह. पो. नी. आनंदराव घाडगे सा., यानी पो.स्टे. देवरी व उप मुखालय देवरी येथे तैनातिस असलेल्या महिला तसेच अंशकालीन कामगार महिला यांचे उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन देवरी येथे पार पाडला .सर्वप्रथम पहिली महिला शिक्षीका कान्तीज्योती सावित्रीबाई फुले, स्वतंत्र्याची चेतना देणारे राणी दुर्गावती तसेच जिजाऊ मॉ. साहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यकमास सुरुवात करण्यात येऊन पो.स्टे. देवरी उप. मुखालय देवरी येथे तैनातिस , असेलेल्या महिला कर्मचारी यांना मा. प्रिया बनकर मॅडम देवरी यांचे हस्ते जागतिक महिला दिनानिमीत्त भेटवस्तु देवुन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मपोहवा. आशा मेश्राम यांनी केले. जागतिक महिला दिननिमित्त मपोहवा. सुनिता पंधरे, मपोहवा. रिना तिवारी, मपोना. लता राजाभोज, मपोशी. संगिता टेकाम, यांनी जागतिक महिला दिनानिमीत्त आपले मनोगत व्यक्त करुन पोलीस स्टेशन देवरी चे वतीने दर वर्षी जागतिक महिला कर्मचा-यांचा सन्मान करण्यात येत असल्याबद्दल मा. श्री. अशोक बनकर सा. अप्पर पोलीस अधिक्षक कॅम्प देवरी जिल्हा गोंदिया, मा. संकेत देवळेकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांचे आभार मानले.
मा. श्री. अशोक बनकर सा. अप्पर पोलीस अधिक्षक कॅम्प देवरी यांनी आपले अध्यक्षिय भाषणा मध्ये सर्व प्रथम ज्ञात ज्योती, कांती ज्योती पहिला महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले शौर्य आणी पराक्रमी रुपाने आपले राज्याचे रक्षण करण्यासाठी मुगला सोबत लढली एक अतिशय धाडशी आणी निर्भय स्त्री राणी दुर्गावती तसेच ज्यानी आपले स्वराज्याचे स्वपन बघितले व ते सत्यात उतवरिले आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला घडले. मा. राजमाती जिजाऊ यांचे प्रतिमेलः अभिवादन करुन महिलांचा स्वतःचा हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा सन्मानार्थ संपुर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस आनंदात साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले आजची स्त्री सर्वच क्षेत्रामध्ये चांगले प्रकारे काम करताना दिसुन येत असल्याचे सांगुन त्याचा सनमान, आदर करणे सर्वांचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले आजच्या दिवसी महिलानी स्वतःचा हक्कासाठी दिलेल्या लढांच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपुर्ण जगात जागतिक महिला दिवस म्हणुन आनंदात साजरा केला जातो. या दिवसाला आंतराष्ट्रिय महिला दिन जागतिक महिला दिन असे ही म्हटले जाते. ८ मार्च रोजी नाही तर प्रत्येक दिवसी महिलाना आदर सम्मान दिला जातो. महिला बद्दल , आदर,अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो प्रत्येक महिलासाठी हा आजचा दिवस आनंदाचा आणी अभिमानाचा दिवस असुन स्त्रि कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगीरीच्या स्मरणार्थ १९९० साली कोपनहेग येथे ८ मार्च हा दिवस जागतीक मिहला दिन म्हणुन साजरा करण्याचा ठराव मांडला व तो पास झाला बल्गेरिया व रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणुन सुध्दा साजरा केला जात असल्याचे उपस्थितांना मार्गदर्शन करुन महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाल्याचे मपोहवा. सविता बिसेन यांनी जाहीर केले.