पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

Gondia ◼️पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, श्री संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शना खाली गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की योजने अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लोकांच्या जनहितार्थ त्यांना शास नाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व त्यांनी मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दला तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनात दिनांक-08/03/20 23 रोजी गोंदिया “पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून उपविभाग, देवरी अंतर्गत उपवि भागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री.संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्श नाखाली पोलीस ठाणे चिचगड चे ठाणेदार श्री शरद पाटिल, यांचे मार्गदर्शनात सशस्त्र दुरक्षेत्र बोन्डे अंतर्गत आजरोजी महिला दिनाचे औचित्य साधून AOP बोन्डे येथे विविध कार्यक्रम आयोजित करून घेण्यात आले. जागतिक महिला दिनां निमित्त महिलांचे गायन स्पर्धा भाषण स्पर्धा घेऊन त्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्यांना पण प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आले. दादलोरा खिडकी योजने ची प्रभावी अंमलबजावणी करता यावी याकरिता, पोलिस दल आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने आधार कार्ड update,आभा कार्ड, पॅनकार्ड बनविणे असा भव्य कॅम्प घेण्यात आला. तसेच सदरचा उपक्रम हा दि. 08 ते दि. 11/03/23 पर्यंत राबविण्यात येणार आहे.. सदर उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात एकूण 259 लोकांनी सहभागी होऊन याचा लाभ घेतला. तसेच AOP बोन्डे तर्फे महिलांचा हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात सदर उपक्र मास महिलांनी मोठ्या प्रमाणा सहभाग नोंदवीला . सदरचा कार्यक्रम हा महिलांनी सादर केला. त्याचप्रमाणे मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली “पोलिस दादालो रा खिडकी”/कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून ठाणेदार पोलिस स्टेशन नवेगावबांध श्री. संजय पांढरे, AOP धाबेपवनीचे प्रभारी अजरुद्दीन शेख, यांचे मार्गदर्शना खाली, आज दि-08/03/2023 रोजी गोंदिया पोलिस दल”पोलिस दादालोरा खिडकी”च्या माध्यमातू न उपविभाग देवरी, पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत, स.दु. क्षेत्र धाबेपवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आजरोजी जागतिक महीला दिन मौजा धाबेपवनी येथे साजरा करण्यात आला.तसेच आयुषमान भारत कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड ,आधार कार्ड अपडेट असे उपक्रम राबविण्यात आले.सदर कार्यक्रमाला स.पो. नी पांढरे व पो.उप.नि अझरुद्दीन शेख यांनी महीला दिनाचे महत्व समजावुन सांगुन महीलांचे हक्क व सुरक्षि तता याबाबत मार्गदर्शन केले तसेच आशावर्कर,सरपंच, परीचर, अशा विविध क्षेत्रात काम करणा-या महीलांचा सत्कार करुन भेट वस्तु देण्यात आल्या.सदर उपक्रमात –

1)आभा कार्ड -108
2) आयुष्यमान भारत कार्ड – 141 3)पॅन कार्ड -34 4)आधारकार्ड अपडेट -154 असे कार्ड काढण्यात आले नागरीकानी चांगला प्रतीसाद दर्शविला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उल्लेखनीय उपक्रम पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून पोलीस ठाणे नवेगांवबांध चे स.पो.नी पांढरे, सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपौनी येथील पोउपनि अझरुद्दीन शेख, व सशस्त्र दूरक्षेत्र बोन्डे येथील पो.उप.निरिक्षक राहुल दूधमल, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्तमरितीने कार्यक्रमाचे आयोजन करून राबविले आहे.

Share