पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमाने , सशस्त्र दूरक्षेत्र दर्रेकसा मगरडोहचा स्तुत्य उपक्रम

गोंदिया ◼️मा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, श्री संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शना खाली गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की योजने अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लोकांच्या जनहितार्थ त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात दिनांक- 07/03/ 2023 रोजी गोंदिया पोलिस दल “पोलिस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून उपविभाग आमगांव अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, यांचे मार्गदर्शनाखली पो.स्टे.सालेकसा ठाणेदार श्री बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र दरेकसा अंतर्गत जमाकुडो येथे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामस्थांनी मिळून होळी सणानिमित्त आजू बाजूच्या परिसरातील केरकचरा उचलून पर्यावरण स्वच्छ राखण्या ची तसेच वाईट व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील जमा केलेला केर-कचऱ्याचे दहन करून पर्यावरण पूरक व व्यसन मुक्त होळी साजरी करण्यात येऊन ग्रामस्थांना पर्यावरण स्वच्छ राखणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्व ग्रामस्थां नी पोलीस प्रशासनाचे आभार मानलेत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात दिनांक- 08/03/ 2023 रोजी गोंदिया पोलिस दल “पोलिस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून उपविभाग देवरी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, पो.स्टे. चिचगड ठाणेदार श्री शरद पाटिल साहेब यांचे मार्गदर्शना खाली दि. 08/03/2023 रोजी गोंदिया पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह अंतर्गत ग्राम पंचायत मगरडोह येथे आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन असल्याने गावातील सर्व महिलांच्या उपस्थि तीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असून या दरम्यान महिला सशक्तीकरण, शिक्षण, महिला विकास व अधिकार, शासकीय विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच शिक्षित मातांकडून घडणा-या भविष्यातील चांगली पीढ़ी, बालमनावर होणारे चांगले संस्कार, व्यसनमुक्ति, गांव दारू बंदी याबाबत मार्गदर्शन व प्रबोध न करण्यात आले आहे. याद्वारे पोलीस जनता संबंध सुधारून पोलीस दलाप्रति जनमानसात आपुलकीची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली सदरचा उल्लेखनीय उपक्रम पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा व सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी राबविले आहे.

Share