जागतिक महिला दिनी पाच महिलांचा सुषमा स्वराज पुरस्कार देऊन गौरव

◼️भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे आयोजन

देवरी◼️भारतीय जनता पार्टी महिला आघाडी देवरीद्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज 8 मार्च रोजी भाजप कार्यालय देवरी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा सुषमा स्वराज स्त्री सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .यावेळी आयोजित कार्यक्रमा चे अध्यक्षता अंबिका बंजारा पंचायत समिती सभापती देवरी यांनी केली प्रमुख अतिथी म्हणून महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम, जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई वालोदे, पंचायत समिती सदस्य वैशाली पंधरे, शामकला गावळ,ममता अंबादे, प्रज्ञाताई संगीड वार उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी या मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुमोदिनी येंप्रेडिवार अंगणवाडी सेविका, शकुंतलाबाई राऊत मदतनीस ,संगीताताई परिहार आशा सेविका, इंदिराताई नंदनवार नर्स, सिंधुताई उईके या पाच महिलांचा स्मृतिचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देवून सुषमा स्वराज स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी आपल्या प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुरम म्हणाल्या की,पूर्वेच्या तुलनेने विचार करता आज स्त्रियां बाबत अनेक सकारात्मक बदल कमी अधिक फरकाने घडत आहेत तरीही प्रश्न संपलेले नाही याचे कारण आजही स्त्रीकडे स्त्री म्हणून आणि पुरुषाकडे पुरुष म्हणून पाहिले जाते दोघांनी स्वतःकडे आणि परस्परांकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे आणि माणूसपणाकडे वाटचाल केली पाहिजे, असे सविताताई म्हणाल्या. सुषमा स्वराज यांनी महिला सशक्ती करणा साठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे करिता महिला भाजप आघाडी द्वारे दरवर्षी आठ मार्चला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सुषमा स्वराज स्त्रीशक्ती सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाची अध्यक्षता करताना पं.स.सभापतीअंबिका बंजार म्हणाल्या की शासनाच्या योजनांचा स्त्रियांना लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. नेतृत्व करणारी, संस्कार देणारी जागृती करणारी दिशा देण्याचे कार्य करणारी स्त्री ही सर्वार्थाने महान आहे. यावेळी नूतन सयाम सभापती न. पं.,कमल मेश्राम सभापती न. पं,सीताबाई रं गारी सभापती,पिंकी कटकवार नगरसेविका, कौसलबाई कुंभरे, अंजुताई बिसेन सरपंच वडेगाव, झुलनबाई पंधरे सरपंच सावली, मायाताई निर्वान,रचना उजवने,वनिता दहिकर, शारदा बडोले,बिंझाडेताई,तसेच भाजप महिला आघाडी च्या सर्व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन नूतन सयाम यांनी तर उपस्थितांचे आभार मायाताई निर्वाण यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share