कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमाने पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत विद्यार्थी व पालक सभा
देवरी ◼️सशस्त्र दूरशेत्र मगरडोह यांचा स्तुत्य उपक्रम याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे मा. अपर पोलीस अधिक्षक ,गोंदिया श्री अशोक बनकर मा. उपविभा गीय पोलीस अधिकारी, देवरी, श्री संकेत देवडेकर यांचे मार्गदर्शना खाली गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की योजने अंतर्गत अति दुर्गम नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी त्यांचे पालक, व लोकांच्या जनहितार्थ त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 4 मार्च 2023 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन विद्यार्थी व पालकांची सभा घेण्यात आली. जि.प. प्राथ. शाळा मगरडोह येथील विद्यार्थ्यांची व त्यांच्या आई -वडील यांचे सोबत पालक सभे दरम्यान संपर्क साधुन शासकीय शैक्षणिक योजना, महिला बचत गट अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच राजमाता जिजाऊ मा साहेब यांचे आदर्श घेवून भविष्यातील आदर्श पीढ़ी घडवून नक्षलांच्या भुलथापांना बळी न पड़ता समाजाच्या मुख्य प्रवाहात राहुन सन्मानाने जीवन जगावे यासाठी गोंदिया पोलीस दल सदैव आपल्या मदती करिता तत्पर आहे, असा विश्वास निर्माण करून या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले आहे. याद्वारे पोलीस-जनता संबंध सुधारून पोलीस दलाप्रति जन मानसात आपुलकीची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली सदरचा उल्लेखनीय उपक्रम सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह येथील पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे आणि पोलिस अंमलदारांनी राबविले आहे .