सविता पुराम यांच्या पुढाकाराने पुराडा येथे विकास कामांचे भूमिपूजन
देवरी ◼️तालुक्यातील पुराडा जिप क्षेत्रात जिप महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या पुढाकाराने विविध विकास कामे मंजूर झाली. या विकास कांमाचे भूमिपूजन सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.
जिप सभापती सविता पुराम यांच्या प्रयत्नाने लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शौचालय बांधकामासाठी सहा लक्ष रुपयांचा निधी, चारभाटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगण सपाटीकरणासाठी तीन लक्ष, डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली दुरुस्तीसाठी 4 लक्ष, चांदलमेटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोली बांधकामासाठी 12 लक्ष, सावली येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या दोन वर्ग खोल्या बांधकामासाठी 21 लक्ष व सावली येथे रस्ता खडीकरणासाठी तीन लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकास कामांचे नुकताच पुराम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.