कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमाने पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

◼️सशस्त्र दूरशेत्र पिपरखारी व भरनोली चा स्तुत्य उपक्रम

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे मा. अपर पोलीस अधिक्षक ,गोंदिया श्री अशोक बनकर मा. उपविभा गीय पोलीस अधिकारी, देवरी, श्री संकेत देवडेकर यांचे मार्गदर्शना खाली गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की योजने अंतर्गत अति दुर्गम नक्षलग्रस्त भागातील लोकांच्या जनहितार्थ त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात दिनांक- 04/03 /2023 रोजी गोंदिया पोलिस दल “पोलिस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून उपविभाग देवरी, पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत, सशस्त्र दूरशेत्र पिपरखारी अंतर्गत 1)बिरसा मुंडा कृषि क्रांती,
2)राष्ट्रीय कृषि विकास योजना, अंतर्गत आदिवासी व नक्सल प्रभावित भाग #मौजा-पिपरखारी (पुरामटोला) येथील गरीब आदिवासी महिला शेतकरी # कविता प्रकाश पुराम, यांना निःशुल्क ‘सेंद्रीय खत’ बनविण्याचे कीट बसवले व रासायनिक खते यांच्या भरमसाठ किमती, रासायनिक खतामुळे होणारे शेतीचे नुकसान तसेच शेतकर्‍यां ना आधुनिक शेती, आधुनिक उपकरणे गट शेती, शेतीमधे होणारे अल्प उत्पन्न, तसेच शेतकरी आत्महत्या या बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी गावातील शेतकरी शेतमजूर यांनी पोलीस विभागा च्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी ‘उपविभागीय पोलीस अधिकारी’ मा.संकेत देवळेकर, ठाणेदार शरद पाटील, AOP पिपरखारी चे प्रभारी अधिकारी जानकर,व ईतर अंमलदार उपस्थित होते,आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी,कुमार साय, लीलाबाई पुराम, बाबुलाल पुराम शेतमजूर,नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिनांक 2/03/ 2023 ते 4/03/2023 या दरम्यान सशस्त्र दूरशेत्र भरनोली चे प्रभारी श्री अनिल टार्फे यांचे नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन गोंदिया जिल्हा पोलीस “दादालोराखिड़की योजने” अंतर्गत आयुषमान भारत साठी Aop भरणोली हद्दी मध्ये कॅम्प चे आयोजन करून दिनांक 02/03/2023 रोजी ग्राम ईळदा येथे प्रधानमंत्री जण आरोग्य योजनासाठी 28 तर आभा कार्ड साठी 30 लोकांची नोंदणी करण्यात आली. तसेच दिनांक 03/03/023 रोजी ग्राम राजोली येथे आभा कार्ड साठी 166 तर प्रधानमंत्री जण आरोग्य कार्ड साठी 73 आणि दिनांक- 04/03/2023 रोजी ग्राम भरणोली येथे प्रधानमंत्री जण आरोग्य 134 व आभा कार्ड 61 ची नोंदणी करण्यात आली .. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली सदरचा उल्लेखनीय उपक्रम सशस्त्र दूरक्षेत्र पिपरखारी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री जानकर, सशस्त्र दूरक्षेत्राचे प्रभारी श्री अनिल टारफे आणि पोलिस अंमलदारांनी राबविले आहे .

Print Friendly, PDF & Email
Share