निष्काळजी पणे ट्रॅक्टर चालविणे भोवले, देवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
देवरी ◼️ येथील चिचगड रोड परिसरात दि ०५/०३/२०२३ चे. १४/३० वा. ते १५/०० वा. दरम्यान परसटोला फॉरेस्ट नाका जवळ देवरी येथे आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन क्र. एम.एच. ३५ / एफ-१७८५ हे स्वत:च्या व इतराचे जिविताची काळजी न घेता हयगयीने, भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवितांनी मिळुन आल्याने फिर्यादी पोशि. सिध्दार्थ गुलचंद तागडे, पोस्टे. देवरी, च्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन देवरी येथे गुन्हा रजिष्टर क्रमांक ६२/२०२३ कलम २७९ भादवी सहकलम १८४ मो. वा. का अन्वये दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा. जाधव/ १५८३, पो.स्टे. देवरी, हे करीत आहेत.