ब्रेकिंग: देवरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी 25 हजार दंडासह 6 वर्षाचा कारावास
◼️2014 ला आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मागितली होती 7000 रुपयाची लाच
गोंदिया ◼️आरोपी डॉ. प्रकाश कीशोरीलाल नागपुरे, वय ५४ वर्ष, पद- तालुका आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य नियंत्रण पथक, देवरी जि. गोंदिया (वर्ग-२), (रा. भोस्कर लाईनमन यांच्या घरी किरायाने) मामा चौक गोंदिया जि. मुळ पत्ता गांधी वार्ड, तिरोडा जि. गोंदिया यांनी लाच रक्कम ७०००/- स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असता दि. ०४/०३/२०२३ रोजी मा. श्री. एन. बी. लवटे, तदर्थ जिल्हा न्यायाधिश २ गोंदिया यांनी ६ वर्ष करावास व २५०००/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तकारदार हे सिंगणडोह ता. देवरी येथे आरोग्य विभागात नक्षल प्रभावित व अति दुर्गम भागात. आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असताना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजने अंर्तगत अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता (हार्ड शिप) मासिक ६००० /- रु. शासनाकडुन माहे एप्रिल ते मार्च २०१४ या कालावधी करीता योजने अंतर्गत मिळणारा भत्त्याचे ६०००/- रु. मासिक दराने एकुण- ७२,०००/- रु. मंजुर झाले. त्यापैकी ५४०००/-रु. चा धनादेश एप्रिल २०१४ मध्ये प्राप्त झाला. सदर दोन्ही धनादेश तकारदारास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरी जि. गोंदिया येथुन प्राप्त झाले होते. सदर धनादेश प्राप्त झाल्यानंतर काही दिवसाने तकारदार हे शासकीय कामाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरी येथे गेले त्यावेळी डॉ. प्रकाश कीशोरीलाल नागपुरे, तालुका आरोग्य अधिकारी, देवरी यांनी तक्रारदाराकडुन मी तुमचे एकुण ७२०००/- चे बिल मंजुर करुन दिले आहे याचा मोबदला म्हणुन तुम्ही मला एकुण रक्कमेचा १० टक्के नुसार माझे ७,२००/-रु होतात. कमीत कमी ७००० /- रु मला दयावेच लागतील म्हणुन ७००० /- रु ची मागणी आरोपी यांनी तक्रारदाराकडे केली. करीता तकारादाने एसीबी गोंदिया येथे आरोपी विरुद्ध दिनांक २३/०७/२०१४ रोजी तक्रार केली.
पंचासमक्ष आरोपी कडुन तक्रारदारास झालेल्या मागणी संबंधी पडताळणी करण्यात आली. त्याअनुषंगाने आरोपी डॉ. प्रकाश कीशोरीलाल नागपुरे, यांनी आपले लोकसेवकपदाचा दुरुपयोग करुन, भ्रष्ट व गैर मार्गाने वापर करुन, लाच रक्कम ७०००/- रु. पंचासमक्षं तकारदाराकडुन मागणी करुन, लाच रक्कम ७०००/- रु. पंचासमक्ष स्विकारले.
आरोपी डॉ. प्रकाश कीशोरीलाल नागपुरे, वय ५४ वर्ष, पद- तालुका आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य नियंत्रण पथक, देवरी जि. गोंदिया यांचे विरुद्ध दिनांक २४/०७/२०१४ रोजी पोलीस ठाणे देवरी जि. गोंदिया गुर नं. ३०१२/२०१४ कलम ७,१३(१),(ड) सहकलम १३(२) ला. प्र. कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाची सापळा कार्यवाही व तपास तत्कालीन पोलीस उप अधिक्षक दिनकर ठोसरे, ला.प्र.वि.गोंदियायांनी करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर गुन्हयात शासकीय अभियोक्ता के. एल. खंडेलवाल, यांनी कामकाज बघितले.
श्री. पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि, गोंदिया यांचे मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी पो.हवा./१३९८ अशोक कापसे, यांनी सदर केसमध्ये मा. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणुन कार्यक्षमतेने काम पाहीले.
त्यांना दिनांक ०४/०३/२०२३ रोजी मा. श्री. एन. बी. लवटे, तदर्थ जिल्हा न्यायाधिश २ गोंदिया यांनी आरोपीस ६ वर्ष करावास व २५०००/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नागरिकांना आव्हान करण्यात येते की, त्यांची लोकसेवका विरुध्द तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे खालील माध्यमाद्वारे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल.