शेकडो समर्थकासह रत्नदिप दहिवले करणार भाजप प्रवेश, काही काँग्रेस नेत्यांना योग्य मुहूर्ताची प्रतीक्षा !
◼️ सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस चे मोठे नेते योग्य मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असल्याचे चर्चा
गोंदिया◼️ कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गोंदिया जिल्हा कॉग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले यांनी 24 फेब्रुवारी रोजी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना पाठविला आहे. आता 4 मार्च रोजी अर्जुनी मोर.येथे आयोजित भाजपा मेळाव्यात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकासह भाजपामधे प्रवेश करणार असल्याची विश्वासनिय माहीती आहे. तालुक्यातील रत्नदिप दहिवले हे युवा अवस्थेपासुनच कॉग्रेसचे कार्यकर्ते राहीले होते. जिप सदस्यासह कॉग्रेस पक्षाची लहानमोठी पदे त्यांनी भोगली आहेत. अनेक निवडणुका सुध्दा लढविल्या आहेत.
मात्र कॉग्रेस पक्षात जोमाने कार्य करणार्या कार्यकर्त्यांची किमंत राहीली नसल्याने अखेर त्यांनी कॉग्रेसच्या निवडक नेत्यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत त्यांनी राजीनामा दिला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजीमंत्री राजकुमार बडोले व डॉ.परिणय फुके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दहिवले हे 4 मार्च रोजी अर्जुनी मोर. येथे आयोजित भाजपाचे मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकासह भाजपामधे प्रवेश करणार असल्याची विश्वासनिय माहीती आहे. रत्नदिप दहिवले यांच्या भाजपा प्रवेशामुळे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात भाजपाचे संख्याबळ वाढून भाजपा अधिक मजबुत स्थितीत येईल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे सुत्रांच्या माहितीनुसार काही काँग्रेस नेते भापज प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची वाट बघत असल्याचे जिल्हात चर्चा रंगल्या आहेत.
अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा 4 मार्च रोजी अर्जुनी मोर. येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी आयोजित केला आहे. यावेळी कॉग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले रत्नदिप दहिवले आपल्या तिनसे कार्यकर्त्यांसह भाजपमधे प्रवेश करणार आहेत. तर संपूर्ण विधानसभा क्षेत्राअंतर्गत जवळपास दोन अडीच हजार विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपामधे प्रवेश करणार असल्याची माहिती माजीमंत्री राजकुमार बडोले व अर्जुनी मोर. तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांनी व्यक्त केले आहे.