जिल्हा मुख्यमंत्री सचिवालयामुळे प्रशासनात लोकाभिमुखता येणार: स्मीता बेलपत्रे

गोंदिया ◼️ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून आतापर्यंत विविध प्रकारच्या 30 तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याचे निवासी जिल्हाधिकारी तथा कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 22 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषद सांगितले.

पुढे बेलपत्रे म्हणाल्या, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी असतील. तसेच एक नायब तहसीलदार व एक लिपीक हे या कक्षाचे काम पाहतील. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी या कक्षामध्ये प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात असल्याचे बेलपत्र Smita Belpatre यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खोली क्रमांक 102 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालयमध्ये आतापर्यंत 30 अर्ज प्राप्त झाले असून 9 अर्ज शासकीय स्तरावर 1 इतर जिल्ह्यातील आणि 20 अर्ज जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यालय अंतर्गत असलेल्या समस्यांचे असल्याचे बेलपत्र यांनी सांगितले. तक्रारीच्या संदर्भानुसार संबंधित कार्यालयाकडे समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा आणि दर महिन्याला आढावा घेण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

असे असेल कामकाज

अर्ज, संदर्भ व निवेदनांवर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित प्रकरणे (वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने) मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहेत, असेही स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share