रक्तदान जीवनदान ! आता रक्ताचे दर महागले

गोंदिया ◼️ रक्ताची गरज अधिक व साठा कमी अशी गत आहे. त्यातच कोरोनानंतर अनेक रुग्णालयांनी आपले दर वाढविले असतानाच आता त्यात रक्तपिशव्यांच्या दरातही वाढ करण्यात आली. शासकीय रक्तपेढीतील रक्तपिशवीवर 250 रुपये तर खासगी रक्तपेढ्यांतील रक्तपिशवीवर 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. रक्तपिशव्यांच्या या नव्या दरामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे.

वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता महत्वाची असते. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रक्तपिशव्यांच्या किमतीत वाढ केली. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची पिशवी 850 रुपयांना मिळायची. तर आता 240 रुपयाने वाढल्याने 1100 रुपयांची झाली आहे. शासकीय रक्तपेढ्यांनी रक्तपिशवी दरात वाढ केल्यानंतर आता खासगी रक्तपेढ्यांनीही दरवाढ केली आहे. 1450 रुपयात मिळणारी रक्तपिशवीचे दर वाढवून 1550 रुपये केली आहे. विशेष म्हणजे, शासकीय व खासगी रक्तपेढीतील ‘प्लाझ्मा’, ‘प्लेटलेट्स’ व ‘क्रायोप्रेसिपिटेट’च्या दरात वाढ झालेली नाही. येथील बाई गंगाबाई रुग्णलयात मोफत रक्त देण्याची सोय आहे. परंतु, रोज रक्तदात्यांकडून उपलब्ध होणारे रक्त व मागणी यात मोठी तफावत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करावे लागते.

रक्तघटक शासकीय दर खासगी दर

संपूर्ण रक्त 1100 प्रती बॅग 1500 प्रती बॅग

लाल रक्तपेशी 1100 प्रती बॅग 1500 प्रती बॅग

प्लाझ्मा 300 (बदल नाही) 400 (बदल नाही)

प्लेटलेट्स 300 (बदल नाही) 400 (बदल नाही)

क्रायोप्रेसिपिटेट 250 (बदल नाही)

Print Friendly, PDF & Email
Share