अंगणवाडी कर्मचार्‍यांचे विविध मागन्यांसाठी आंदोलन

देवरी ◼️राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेच्या आव्हानानुसार 20 फेब्रुवारीपासून संप सुरु असून 21 फेब्रुवारी देवरी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयसमोर अंगणवाडी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.

अंगणवाडी सेविका,मदतनीस व मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, नियमित पेंशन लागू करण्यात यावी, मराठी भाषेत पोषण आहार टेकर सुरु करून नवीन मोबाइल देण्यात यावा, कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, आदी कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत. तालुक्यातील जवळपास दोनशे अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिली आहे.

Share