देवरी: शेतामध्ये जाण्याकरीता रस्ता नसल्याने कंटाळुन शेतकऱ्याने स्वतःला संपवले !

देवरी ◼️ तालुक्यातील शिलापुर येथील मृतक बळीराम जिवन बघेले, वय ५५ वर्ष, रा. शिलापुर, याने दिनांक १३/०२/२०२३ चे सायं ०६:००० वा. सुमारास शेतामध्ये जाण्याकारीता रस्ता नसल्याने कंटाळुन स्वतःचे शेतामध्ये विषारी औषधांचे सेवन करुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. विष सेवनाने त्याची प्रकृती खराब झाल्याने प्रथम उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले परंतु प्रकृती अधिक बिघडल्यामुळे खाजगी रुग्णालय गोंदिया येथे रेफर व नंतर नागपुर मेडीकल वार्ड क्र. ५२ येथे दिनांक १४/०२/२०२३ चे १६:३३ वा. भर्ती केले, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासुन दिनांक १६/०२/२०२३ चे २३:०५ वा. मृत घोषीत केले. प्राप्त कागदपत्रावरून पोस्टे देवरी येथे अकस्मात मृत्यु क्र. ०२/२०२३ कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी पोहवा / ११५४ करंजेकर, पोस्टे. देवरी, हे करीत आहेत.

Share