देवरी नगरपंचायत सभापती पदाची निवडणुक बिनविरोध, वाचा कोण आहेत नगरपंचायतीचे नवीन सभापती ?

देवरी ◼️नगरपंचायत देवरीच्या सभापती पदाच्या निवडणुका आज घेण्यात आल्या त्यामध्ये महिला व बालकल्याण सभापती कमल मेश्राम , महिला व बालकल्याण उपसभापती सीताबाई रंगारी, बांधकाम सभापती रितेश अग्रवाल, अर्थ व नियोजन सभापती पद नूतन सयाम यांच्यावर्णी लागली आहे.

सदर निवडणुकीत कोणतेही मतदान न घेता निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली.निवडणूक प्रक्रियेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली अकरा ते बारा वाजेपर्यंत समिती सभापती पदाचा अर्ज दाखल करणे होते. त्यामध्ये सर्व सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेमध्ये पीटासीन अधिकारी म्हणून तहसीलदार गौरव इंगोले , प्र.मुख्याधिकारी पवार, कर अधिकारी आचले यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

यावेळी देवरी तालुका भाजपचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share