स्थायी समितीच्या सभेला उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांनाजि.प.अध्यक्षांनी केली प्रवेशबंदी
गोंदिया – गोंदिया जिल्हा परिषद ही एकेकाळी आयएसओ नामाकिंत जिल्हा परिषद होती.मात्र आजच्या घडीला या जिल्हा परिषदेने आपले आयएसओ नामाकंन गमावले असून अधिकारी व कर्मचारीही आत्ता मस्तवाल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.आज 22 फेबुवारीला दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.य़शवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र यावेळी सुध्दा एकही अधिकारी त्या सभागृहात हजर नव्हता विशेष म्हणजे स्थायी समितीची जबाबदारी असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी सुध्दा गैरहजर होते.आधीच 1 वाजेची सभा ही दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली.त्या सभेला सर्व पदाधिकारी सभागृहात आधी पोचले मात्र एकही अधिकारी पदाधिकारी पोचूनही पोचलेले नव्हते.जेव्हा कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात य़ेताच उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बोलावून घेतले.त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व एकदोन विभागप्रमुख वगळता एकही अधिकारी सभागृहात हजर झाले नाही.त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी संताप व्यक्त करीत उशीरा आलेल्या सर्व विभागप्रमुख,स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी,बांधकाम,पंचायत विभागाचे काही कर्मचारी यांना सभागृहाच्या प्रवेशव्दारावरच सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून रोखण्यात आले.त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे,कृषी अधिकारी महेंद्र मडामे,पशुसंवर्धन अधिकारी पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन वानखेडे,लघु पाटबंधारे विभागाचे राऊत,स्वच्छता व पाणी विभागाचे कर्मचारी हे बाहेर रांगेत उभे असल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यानंतर सभा सुरु करण्यात आली.विशेष म्हणजे सभागृहाच्या प्रवेशव्दारावजवळ बाहेर असलेल्या आदी अधिकारी कर्मचारी यात बहुतांश कायद्याची भाषा आणि आपल्यालाच अधिक समजते असे सांगणारेही बाहेरच ताटकळत राहिले.आत्ता जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.