धक्कादायक! जिल्हात १० महिन्यांत ४५१ बालकांचा बळी
◼️बालमृत्यूचे तांडव सुरूच; रुग्णालयात ९९.९७ प्रसूती होऊनही माता व बालमृत्यू थांबेना
गोंदिया ◼️जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.९७ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणा कमी करण्यात यश आले नाही. कुपोषणासह इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मागील १० महिन्यांत २०६ अर्भक तर ५ वर्षातील २४५ अशा ४५१ बालकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ च्या एप्रिल ते जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ३२० महिलांची प्रसूती झाली. यातील १४ हजार ३१६ महिलांची शासनाने महिलांना आरोग्य होऊनही बालमृत्यू थांबविण्यात म्हणजेच ९९.९७ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली. तर केवळ ४ महिलांची प्रसूती घरी झाली आहे. एकूण प्रसूतींपैकी ४ हजार ८४ उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ९ हजार ८५० प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे ३१७ प्रसूती करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसूती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थाबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.