सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालय डवकी 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

देवरीः सिध्दार्थ हॉयस्कुल व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय डवकी या ठिकाणी 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचा सत्कार केला. प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी आपल्या जिवनाचे ध्येय ठरवायचे असते. त्यासाठी जिद , चिकाटी, मेहनत या तिन गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. तेव्हाच जिवनामध्ये आपण आपली प्रगती करू शकतो. तसेच कार्यकमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा. आनंदराव घाडगे API पोलिस विभाग देवरी यांनी विद्यार्थांना शिक्षणाचे महत्त्व सांगतांना पुढे जाण्यासाठी ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राची निवड करा. तसेच चरण उंदिरवाडे संस्थापक महिला महा. देवरी यांनी सुध्दा विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुण व क्षमता ओळखून आपले ध्येय ठरवावे व ध्येयवेडे व्हावे . तसेच विठ्ठल कळबंकर PSI पोलिस विभाग देवरी लोकसेवा परीक्षे विषयी विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पवनजी अग्रवाल हास्य कवी देवरी यांनी सुध्दा कवितांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक ठवरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेंद्र बोरकर, सुषमा जंवजार. ममता टेभुंर्निकर, सरीता मेश्राम, धमेंद्र भोवते, हिना बडगे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा लांजेवार, दिव्या भुरकुडे विंक्कल घासले, हर्षाली कुरसुंगे, अश्विन परिहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन हीना बडगे तर आभार योगेंद्र बोरकर सर यांनी केले. व महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Share