प्रतापगड यात्रेत भोवळ येऊन महिलेचा मृत्यू

अर्जुनी/ मोर: तालुक्यातील प्रतापगड येथे आज, 18 नोव्हेंबर रोजी महाशिवरात्री उत्सवासाठी आलेल्या महिलेचा प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभा निळकंठ कुंभरे रा. नवेगावबांध असे असे मृत महिलेचे नाव आहे. यात्रेत सहभागी होऊन शिवदर्शनासाठी जात असताना सीतामाई नहाणीजवळ त्यांना भोवळ येऊन कोसळल्या. दरम्यान नागरिकांनी जवळील आरोग्य विभागाचे शिबिरात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केली. प्रतापगड यात्रेमधील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.

Print Friendly, PDF & Email
Share