गोंदिया जिल्हात लालबुंद स्ट्रॉबेरी चे उत्पादन

गोंदिया : योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर प्रतिकुल भौगोलिक वातावरणातही जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने लालबुंद स्ट्रॉबेरीचे उत्पदन घेण्याची किमया केली आहे.

तालुक्यातील चारगाव येथील प्रयोगशिल शेतकरी संजय जसाणी हे त्यांच्या 22 एकर शेतीत भाजीपाला पीक घेतात. स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रुट यासारखे नवनविन फळ लागवडीचे प्रयोग कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जसाणी करतात. त्यांनी नव्यानेच 20 आर जागेत 4500 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. त्यापासून त्यांना स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरु आहे. 200 ग्राम डब्याची पॅकींग करुन गोंदियाच्या बाजारात विक्री करीत आहेत. स्ट्रॉबेरीचे 1.5 टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी स्ट्रॉबेरी क्षेत्रात वाढ करण्याची इच्छाही जसाणी यांनी मिळता नफा पाहून व्यक्त केली.

माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या वतीने येथील प्रशासकीय इमारतीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ‘मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन’ कार्यक‘मात कृषी विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलमध्ये तृणधान्य सोबत संजय जसाणी यांच्या शेतातले लालबुंद स्ट्रॉबेरीचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिपचे मु‘य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या सहायक संचालक निकीता जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी स्ट्रॉबेरीची चाखूण गोंदियातील मातीतही स्टॉबेरी होऊ शकते. याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share