आमची शाळा, आदर्श शाळा उपक्रमात डवकी शाळा प्रथम
देवरी: जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अदानी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आमची शाळा, आदर्श शाळा उपक‘मातंर्गत तालुक्यातील डवकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अदानी फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी व शाळेचा सर्वांगिन विकास साधला जावा या हेतूने जि. प. शिक्षण विभाग गोंदियाच्या माध्यमातून आमची शाळा, आदर्श शाळा उपक्रम मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे ग्राामस्थांचा लोकसहभाग, शालेय स्पर्धा, शाळेची भौतिक सरंचना, स्पर्धा परिक्षेत शाळेचे योगदान, विविध नाविण्य पूर्ण उपक‘म, विद्यार्थी गुणवत्ता आदी निकषांवर मूल्यांकन केले गेले. यात डवकी शाळा तालुक्यात अव्वल ठरली आहे.
शाळेचे मु‘याध्यापक ज्ञानेश्वर लांजेवार यांच्या प्रेरणेने शिक्षक सुरेशसिंह कश्यप, लोकनाथ तितराम, विनोद बहेकार, आनंद डोंगरे, दिनेश सोळी यांच्या मार्गदर्शनात शाळेने उत्तम कामगिरी केली. यासाठी शाळा व्यस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, ग‘ामपंचायत पदाधिकार्यानी वेळोवेळी सहकार्य केले. याबद्दल गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, गटसमन्वयक कावळे, गटसाधन व्यक्ती लोथे, शेंद्रे, भरणे, डोंगरे, केंद्र प्रमुख सुरेशसिंह कश्यप, सरपंच गौरव परसगाये, उपसरपंच अनिता बावने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रमिला टेंभरे, उपाध्यक्ष केशवराव फरदे यासह पालक व ग‘ामस्थांनी शाळेचे कौतुक केले आहे.