कृषी विद्युत वाहिणीवर पुन्हा 16 तासांचे भारनिमय

गोंदिया◼️ जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना दोन महिन्यांपासून 12 तास वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता महावितरणने पुन्हा कृषी वाहिणीवरून 16 तासांचे भारनियमन सुरू केले आहे. दिवसाला 12 तास वीज देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन अवघ्या दोन महिन्यातच फोल ठरले. बुधवारपासून जुन्याच वेळापत्रकानुसार दिवस व रात्रपाळीत केवळ 8 तास कृषी वाहिणीवरून वीज पुरवठा सुरू झाला आहे. हिंस्त्र पशू, श्वापदांच्या भितीच्या सावटात शेतकर्‍यांनी सिंचन करण्याची वेळ आली आहे.

शासनाने 30 नोव्हेंबरच्या परिपत्रकान्वये दिवसाला 12 तास वीज देण्याचे नियोजन केले होते. या निर्णयाने रात्रीच्या अंधारात जीव मुठीत घेऊन शेती करण्याचा कठीण प्रसंग सुटला होता. मात्र, हा निर्णय औटघटकेचा ठरला. शेतकर्‍यांना पुन्हा जीव मुठीत घेऊन शेतीला सिंचन करावे लागणार आहे. डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यातच दिवसाला 12 तास वीज मिळाली. पुन्हा जुन्याच दिवस-रात्रीच्या 8 तासांच्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा सुरू झाला आहे. आठवड्यात वेगवेगळ्या वाहिणीवर दिवस-रात्रीचे नियोजन केले असल्याची माहिती महातिरणच्या सुत्रांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त आहेत. उन्हाळी धानपीक लागवड सुरू आहे. येत्या काळात सिंचनाची गरज भासणार आहे. अशात 8 तासात शेती कशी सिंती करावी असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share