अंगणवाडी कर्मचार्‍यांनी केले मोबाईल परत

गोरेगाव ◼️शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत नाही, त्यामुळे त्यांना दुसर्‍या मोबाईलमधून कामकाज करावे लागत आहे. दिवसेंदिवस कामकाज वाढून मोबाईलची क्षमता पुरत नसल्याने गोरेगाव बालविकास प्रकल्प विभाग कार्यालयात सेविका व मदतनीसांनी आज(दि.23) आंदोलन करुन 144 मोबाईल परत केले आहे. शासनाच्यावतीने २ वर्षापूर्वी सेविका व मदतनिसाना सरकारी कामकाजासाठी मोबाईल दिले होते.सदर मोबाइलची क्षमता कमी असणे, यासह विविध समस्या उदभवत असल्याने अनेक वेळा कळवून आंदोलने करुनही मोबाईल बदलून मिळत नसल्यामुळे मोबाईल अंगणवाडी सेविका व मदतनीसानी परत केले. मोबाइलची क्षमता कमी असून,मोबाइल गरम होणे यासह सरकारी कामकाजात विविध समस्या उदभवत असल्याने हँडसेट बदलून मिळण्याची एकमुखी मागणी सेविका व मदतनीस यांनी केली आहे.आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले,जिला उपाध्यक्ष विना गौतम,तालुका अध्यक्ष पुष्पा ठाकुर,सचिव अजंना ठाकरे,निवृता मेश्राम,ममता वासनिक,संतोषी बघेले,भुमेश्वरी रहांगडाले,वर्षा बावनकर,रत्नमाला गेडाम यांच्या नेतृत्वात प्रकल्प अधिकारी श्रीमती श्रीवास्तव, विस्तार अधिकारी श्रीमती मेंढे यांना निवेदन देऊन मोबाईल परत करण्यात आले.

Share