देवरीः बाल लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला आयुष्य संपेपर्यंत कारावास
गोंदिया◼️बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला जिल्हा न्यायाधिश तथा विशेषशे सत्र न्यायालयाने आज, 23 जानेवारी रोजी आजन्म समश्र कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्रकुमार शहारे (56) रा. देवरी असे आरोपीचे नाव आहे.आरोपी व 10 वर्षीय पीडित मुलगी हे नातेवाईक असून 2021 मध्ये शाळेतून मैत्रीणींसोबत घरी जाताना आरोपीच्या घरासमोर खेळत असायची.नातेवाईक असल्याचा फायदा उचलून तो तिला विविध आमिषे दाखवून जवळील जंगलात घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा.मात्र ती येत नसल्याचे पाहून 13 जुलै 2021 रोजी तिला जबरदस्तीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही घटना कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. परिणामी ही घटना भीतीपोटी पीडित मुलीने घरी सांगितली नाही.मात्र मैत्रीणीला सांगितले. दरम्यान आरोपी हा दररोज पीडितेला जबरदस्तीने जंगलात घेऊन जात असल्याची बाब गावातील एका महिलेच्या लक्षात आली.तीने हा प्रकार पीडित मुलीच्या आईला
सांगितले.याप्रकरणी 28 जुलै रोजी चिचगड पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी तपासाअंती आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यान न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी 5 साक्षदारांची साक्ष नोंदविली.तर आरोपीचे वकील व सरकारी वकीलांच्या युक्तीवादानंतर आरोपीवर गुन्हा सिध्द झाल्याने न्या.एन.बी.लवटे यांनी आरोपी राजेंद्रकुमार शहारे याला कलम 42 पोक्सो अॅक्टमधील तरतुदीनुसार आजन्म कारावास, 10 हजार दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त कारावास तसेच कलम 506 नुसार 1 वर्षाचा सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच दंडाची रक्कम पीडिताला देऊन मनोधर्य योजनेतंर्गत पीडितेला ते सानुग्रह राशी देण्याचे आदेशित केले आहे. न्यायालयीन कामकाजात चिचगडच्या मपोशि रिंपी हुकरे यांनी काम पाहिले.