नक्षलग्रस्त भागातील महिलांसाठी ‘महिला मेळावा’चे आयोजन. केशोरी पोलीस स्टेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम

पोलीस स्टेशन केशोरी येथे दिनांक 23/01/2023 रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत मकर संक्रात सणाचे औचित्य साधून महिलांकरिता महिला मेळाव्या चे आयोजन करून हळदी कुंकू तसेच भेटवस्तू देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सदर महिला मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी सौ. अनिता कदम मॅडम, उद्घाटिका सौ. बडोले मॅडम, प्रमुख अतिथी सौ.शेख मॅडम, सौ. झोळे मॅडम, सौ. चेटुले मॅडम, सौ.काटगाये तसेच विशेष अतिथी म्हणून पो. ठाणे केशोरीचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम, सपोनि शेख उपस्थित होते.

सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थित पोलीस अंमलदार यांच्या परिवारातील महिला व गावातील महिला यांची ओटी भरून, त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

उपस्थित सौ. अनिता कदम मॅडम व सौ.बडोले मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी आत्मनिर्भर होऊन, स्वतःची व आपले परिवाराची उन्नती करावी, आपल्या मुलांना योग्य संस्कार द्यावे, महिला सक्षमीकरण व स्वरक्षणावर भर देऊन, महिला व बालकांचे गुन्हेगारी संबंधाने उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस हवालदार सुशील रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन महिला पोलीस अमंलदार शिल्पा जनबंधू यांनी केले.

सदर ‘महिला मेळावा’ मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कदम यांच्या संकल्पनेतून सपोनि.शेख, पोलीस हवालदार सुशिल रामटेके, दिपक खोटेले, महिला अंमलदार पुनम हरीनखेडे, मीना चांदेवार, पल्लवी चांदेकर, सुनीता नेवारे, निशा सांर्वे व सुरेखा खोटेले यांनी यशस्वीरित्या पार पडला.

Share