14 वर्षांत 450 पेक्षा अधिक पायलट प्रशिक्षित

गोंदिया◼️ तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून विमानांना उड्डण घेण्यास अनुकूल वातावरण आहे. या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु असून मागील 14 वर्षात येथे 450 पेक्षा अधिक पायलट तयार झाले आहेत. आजघडीला 45 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

ब्रिटीश कालीन असलेल्या बिरसी विमानतळावर तत्कालीन विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात हे विमानतळ व पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. येथे पायलट प्रशिक्षण केवळ हिवाळ्याच्याच दिवसात दिले जात होते.हिवाळ्यात रायबरेली येथे धुबे खूप राहत असल्यामुळे उड्डाण प्रशिक्षण होत नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसात रायबरेली येथील इंदिरा गांधी शिकाऊ पायलट येथे येतात. हिवाळ्यातही येथे पायलट प्रशिक्षणसाठी हवामान अनुकूल राहत असल्याने पायलटला अधिकाधिक उड्डाणे घेण्यास मदत होत असून चांगले पायलट तयार होत असल्याचे प्रशिक्षण केंद्राचे संचालक कुष्णेंद्रू गुप्ता यांनी सांगितले. सध्या या प्रशिक्षण केंद्रात 25 मुले व 20 मुली पायलट प्रशिक्षण घेत असून मागील दीड वर्षात 90 पायलटर तर 15 वर्षात 450 पेक्षा जास्त पायलट या प्रशिक्षण केंद्राने दिले आहेत.

विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी बिरसी येथील वातावरण खूप अनुकूल आहे. यामुळे आता उड्डाण प्रशिक्षण वाढले आहे. आतापर्यंत 130 तासांचे उड्डाण पूर्ण केल्याची माहिती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षार्थी विद्यार्थी अनमता अंसारी हिने दिली.

Share