देवरी भाजपने केला पंधरा सरपंचांचा सत्कार
देवरी ◼️मागील डिसेंबर महिन्यात देवरी तालुक्यात झालेल्या २५ ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजप समर्थक म्हणून निवडून आलेल्या १५ सरपंच आणि शेकडो ग्राम पंचायत सदस्यांचा २१ जानेवारी शनिवारला स्थानिक भाजप कार्यालयात तालुकास्तरीय पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
यावेळी गडचिरोली लोकसभा क्षेत्रातचे खासदार अशोक नेते, प्रदेश सचिव संजय पुराम, भंडारा – गोंदिया जिल्हा संघटक वीरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग येरणे, प्रमोद संगीडवार, सचिव यादवराव पंचमवार, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव नाईक, श्रीकृष्ण हुकरे, केशवराव भुते, सुखचंद राऊत, जि. प. सभापती सविता पुराम, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भांडारकर, सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, पं. स. सदस्य शालीकराम गुरनुले, ममता अंबादे, शामकला गावड, वैशाली पंधरे, नगराध्यक्ष संजय उईके, उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, सरपंच अंजू बिसेन, उपसरपंच देवेंद्र हिरवानी, सभापती आफताब शेख, संजय दरवडे, तनूजा भेलावे, नगरसेविका कौशल्या कुंभरे, सीता रंगारी, पिंकी कटकवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू, तालुकाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटीया, महामंत्री नितेश वालोदे, कृष्णदास चोपकर, योगेश ब्राह्मणकर, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रहांगडाले, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष इमरान खान, विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू, पियुष दखने, पंचायत समिती सदस्य तथा नगर पंचायतचे सर्व नगरसेवक आणि इतर शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय पुराम आणि दोन्ही जिल्ह्याचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर या सर्वांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली.
यात देवरी तालुक्यातील भाजप समर्थक नव्याने निवडून आलेल्या ओवारा ग्रामपंचायचे सरपंच भाऊराव येरणे पासून सर्व १५ सरपंच आणि अनेक ग्रामपंचायतचे सदस्य या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यात सर्व सरपंचांनी गावाच्या विकासासाठी एकजुटीने विकासकामे करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.