भाजपच्या महिला मेळाव्यात स्त्री सक्षमीकरणावर भर
देवरी ◼️भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महिलांवर वाढलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणावर मानले. भर, स्वसंरक्षणावर जनजागृती करण्यात आली.
उद्घाटन जिल्हा परिषद सभापती सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वसंरक्षणाबाबत महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले, तसेचमहिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचालन पिंकी कटकवार यांनी केले. आभार नूतन सयाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी न. प. उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, पं.स. सभापती अंबिका बंजार, कौशल्या कुंभरे, सीताबाई रंगारी, कमल मेश्राम, कृष्णा येरने, जय श्री येरणे, पंचमवार, कल्पना वालदे, ममता अंबादे, वैशाली पंधरे, शामकला गावळ, रचना उजवणे आदींनी सहकार्य केले.